Top News

बोगस यु ट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करणार्‍यांनो सावधान

नगरमधील युवतीची ४ लाख १३ हजारांची ऑनलाईन फसवणूक



अहमदनगर - युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्याचा टास्क पूर्ण केल्यास अधिक पैसे देण्याच्या उद्देशाने अहमदनगर मधील एका फॅशन डिझायनर असलेल्या २८ वर्षीय युवतीची सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४ लाख १३ हजार २०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी शहरातील माणिक चौक परिसरातील युवतीने मंगळवारी (दि.) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी युवतीच्या मोबाईलवरील व्हॉट्सऍपवर दि.२६ जुलै रोजी एका अनोळखी मोबाईलवरून मेसेज आला. तुम्ही युट्यूबवर आमच्या चॅनलचे लाईक आणि सबस्क्रायबर वाढविण्यासाठी आम्ही पाठविलेल्या लिंकला ओपन करून त्या लिंकचे लाईक आणि सबस्क्रायबर वाढवण्याचे टास्क देऊन तो टास्क पूर्ण झाल्यावर तुमच्या अकाऊंटला पेमेंट जमा होईल, असा तो मेसेज होता. त्यासाठी त्याने टेलीग्राम लिंक पाठविली. त्यावर युट्युब ची लिंक पाठविली. दरम्यान, फिर्यादी युवतीने आलेल्या लिंकवर ओपन करून लाईक आणि सबस्क्रायबरचे पाच टास्क पूर्ण केले. सहावा टास्क पूर्ण करण्यासाठी अगोदर त्यांना पैसे पाठवायचे होते. फिर्यादी यांनी टप्प्याटप्प्याने ४ लाख १३ हजार २०० रुपये एवढी रक्कम वेगवेगळ्या ८ युपीआय आयडी वर ऑनलाईन पाठविली. हा प्रकार २६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत झाला. त्यानंतर सदर युवतीने त्या व्यक्तीला दिलेले पैसे परत मागितले असता समोरील व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला व फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादी वरून पोलिसांनी वेगवेगळे ८ युपीआय आयडी वापरणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर भा.दं.वि.कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post