नगर - शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, नागरी समस्यांची दैना उडाली असल्याने स्थानिक महिलांनी रस्त्याला हळदी-कुंकू वाहून काळे झेंडे लावून महापालिकेचा निषेध केला. महापालिकेने समस्यांची तातडीने दखल न घेतल्यास शाळकरी मुलांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी सुनीता महारनवर, मीनाक्षी चव्हाण, रोहिणी जाधव, हिराबाई फाळके, प्रमिला कानफाडे, सारिका गारपगारे, पुष्पा डेंगळे, गीता ओहोळ, रुपाली उमाप, जयश्री काळे, केशर पवार, संध्या पाडळे, आम्रपाली काळे, मीना निमसे, विमल राख, वैशाली हरेल, शंकर निमसे, दीपक उमाप, दत्तू राख, किशोर हरेल, पांडुरंग पवार, अंगद महारनवर आदी उपस्थित होते. यावेळी सुनीता महारनवर म्हणाल्या की, प्रभाग १७ मधील केडगाव देवी परिसरातील शास्त्रीनगर व समतानगर रस्ता पुढे जाऊन कायनेटिक चौक व दौंड रोडला जोडला जातो. हा या भागातील नागरिकांसाठी मुख्य रस्ता आहे. मात्र, या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
शाळकरी मुलांबरोबरच सर्वांनाच या मार्गाने जाणे दुरापास्त झाल्याने दिवसेंदिवस अडचणीत वाढ होत आहे. ड्रेनेज लाईन तुंबली असल्याने मैलामिश्रित पाण्याचा प्रश्न आहे. महापालिकेला स्वच्छ अभियानासाठी पुरस्कार मिळतो. मात्र, एकीकडे स्वच्छता व दुसरीकडे अत्यंत दयनीय अवस्था कशी असू शकते, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. महापालिकेला आम्ही वास्तव्य करणारे सर्वजण नियमितपणे कर भरत आहोत.
आम्हाला नागरी सोयी मिळणे हा आमचा अधिकार आहे. स्थानिक प्रतिनिधी व प्रशासन ढिम्म असल्याने शहरातील विविध भागांत नागरी समस्याुंळे नगरकर हैराण आहेत. अनेकांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत, असे त्या म्हणाल्या. यावेळी स्थानिक महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आपल्या प्रखर भावना व्यक्त केल्या.
Post a Comment