नगर - काळया बाजारात विक्रीसाठी
चालविलेला शासकिय रेशनिंगचा सुमारे ६ लाख २५ हजार रुपये किमतीचा गहू स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने नगरमध्ये पकडला आहे.
हा गहू नेण्यासाठी वापरण्यात आलेला ४० लाख रुपये किमतीचा मालट्रक ही पोलिसांनी
जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश
आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की, मध्य
प्रदेश राज्यातुन पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी येथील संकेश्वर फुड प्रोडक्ट
प्रा. लि. कंपनी कडे एक सोळा टायर अशोक लेलंड ट्रक (क्र.आर
जे ११ जीसी २७७८) नगर मार्गे जात असून त्यात शासकीय रेशनिंगचा गहु आहे. तो काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत आहे. ही
माहिती मिळताच पो.नि.आहेर यांनी स.फौ.
राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पो.ना.रविंद्र
कर्डिले, सचिन आडवल, पो.कॉ. रणजित जाधव यांना कारवाई साठी पाठविले. या पथकाने छत्रपती संभाजी नगर
रोडवर मुकुंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेल्या स्पीड ब्रेकर जवळ सापळा लावला.
थोड्याच वेळात तेथे संशयित ट्रक आला
असता पोलिसांनी तो थांबवून पाहणी केल्यावर त्यात गव्हाने भरलेले पोते दिसले. सदर
गव्हाचे पोत्या बाबत ट्रक चालकाला विचारणा केली असता त्याने ट्रक मधिल शासकिय गहु हा प्रमोद साहु (रा.
खणीयादाणा, ता जि. शिवपुरी, मध्यप्रदेश) यांचे मालकिचा असुन तो विक्री करीता संकेश्वर फुड प्रोडक्ट
प्रा. लि. कंपनी, सुपा एम आय डीसी येथे घेवुन चाललो असल्याची
कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी ट्रक मधील अनिल ताराचंद बगेल (वय २१, राकोरगार, ता.जि. शिवपुरी, मध्य
प्रदेश), अनोज नारायणसिंग बगेल (वय २१, रा बोराणा, ता बेराड, जि.
शिवपुरी, मध्यप्रदेश) या दोन्ही आरोपींना ६ लाख २५ हजारांचा
गहू व ४० लाखांच्या ट्रक सह ताब्यात घेतले.
याबाबत स.फौ. राजेंद्र वाघ यांच्या यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या
फिर्यादी वरुन जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ व ३ मधिल दिलेल्या (४५)
सार्वजनीक वितरण प्रणाली नियंत्रण आदेश २००१ व (६२) गहु (कंपनी किंवा फर्म किंवा
व्यक्तीव्दारे स्टॉक घोषण) ऑर्डर २००९ या नियमांचा भंग व भा.द.वि. कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment