अहमदनगर - पोलिस ठाण्यात दाखल असलेले २
चोरीचे, १ खुनाचा प्रयत्न तर १ आत्महत्येस
प्रवृत्त केल्याचा गुन्हा असे ४ गुन्हे एमआयडीसी पोलिसांनी एकाच दिवसात उघडकीस आणत
४ आरोपींना ४ वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. सहाय्यक
पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील विविध पथकांनी ही कामगिरी केली
आहे.
एमआयडीसी एम २७,
नवनागापुर येथील दर्शन इंजिनिअरींग कपंनीमधुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने
७०,००० किमतीचे बॅटरी बनविण्याचे लिड गुरुवारी (दि.२७)सायंकाळी
६ ते शुक्रवारी (दि.२८) सकाळी ७ वाजेच्या दरम्यान चोरुन नेले होते. याबाबत सागर आबासाहेब निमसे (रा. बुऱ्हाणनगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा
दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करत असतांना स.पो.नि.
सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा दिपक तुकाराम
पालवे (वय २७, रा. गांधीनगर, बोल्हेगाव)
याने केला आहे. सदर आरोपी हा बोल्हेगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पो.हे.कॉ. टेमकर, पो.ना. भागवत, पो.कॉ.किशोर जाधव,
शुभम सुद्रीक, गजानन गायकवाड, नवनाथ दहिफळे यांना कारवाई साठी पाठविले. या पथकाने दीपक पालवे याला अटक करत
त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कंपनी मालकाची रोकड पळविणारा टेम्पोचालक पकडला
चोरीचा दुसरा गुन्हा रविवारी (दि.३०) दाखल झाला होता. एका ऑईल कंपनीचे
मालक रौफ शमसुददीन सय्यद (वय ३२, रा. बोल्हेगाव) यांनी त्यांच्या टेम्पोचा चालक महेश रामदास कोरडे (वय २८,
हिवरे कोरडा ता.पारनेर) यास छत्रपती संभाजीनगर येथून कंपनीचा माल भरण्याकरीता
१ लाख ८९ हजारांची रोख रक्कम दिली होती. त्याने ती चोरुन नेली
आहे. अशी फिर्याद सय्यद यांनी दिली होती. हा गुन्हा दाखल होताच
स.पो.नि.सानप यांनी
आरोपीचा शोध घेण्यासाठी पो.ना. नेहुल, गणेश पालवे, भागवत, पो.कॉ. किशोर जाधव,
शुभम सुद्रीक, गजानन गायकवाड, नवनाथ दहिफळे, गवारे यांचे पथक पाठविले. या पथकाने आरोपी कोरडे याला वडगाव गुप्ता शिवारात पकडले आहे. चोरीच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी
दिली आहे.
फरार असलेला सराईत गुन्हेगार पकडला
मित्राचे हळदीचे कार्यक्रमात मिरवणुकीत
डीजेच्या तालावर नाचत असतांना धक्का लागल्याचे कारणावरुन अक्षय हिरामण गायकवाड या तरुणावर
धारदार शस्राने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार सिद्धांत
उर्फ दादया रावसाहेब शिंदे (वय २२, रा. निंबळक
ता.नगर) याला निंबळक स्मशानभूमीजवळ पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.ना. साबीर शेख, भागवत, पो.कॉ.किशोर
जाधव, जयशिंग शिंदे, सुरज देशमुख,
नवनाथ दहिफळे, राजेश राठोड यांचे पथकाने शिताफीने
पकडले आहे. खुनाच्या प्रयत्नाची ही घटना २३ मे २०२३ रोजी सायंकाळी
निंबळक येथे घडली होती. तेव्हापासून आरोपी फरार होता. अखेर त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपी
सिद्धांत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ३ गंभीर गुन्हे एमआयडीसी पोलिस
ठाण्यात दाखल आहेत.
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यास मनमाड
मध्ये पकडले
पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत तिला
मारहाण करून तिचा चेहरा विद्रुप करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या आरोपीला स.पो.नि.सानप यांच्या नेतृत्वाखालील
पथकाने मनमाड येथून अटक केली आहे. मिरीनमय निहार मृधा (वय ३५,
रा. कालिनगर ता. मुलचेरा, जि.गडचिरोली,
हल्ली रा.सुभाष दांगट यांचे भाडयाचे खोलीत,
वनराई कॉलनी, एमआयडीसी) असे
त्याचे नाव आहे.
त्याची पत्नी यविता मिरीनमय मृधा (वय २९)
हिने पतीच्या त्रासाला कंटाळून आणि त्याने केलेल्या जबर मारहाणीत चेहरा विद्रूप झाल्याने
शुक्रवारी (दि.२८) रात्री
घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर
पोलिस आरोपीचा शोध घेत असताना स.पो.नि.
सानप यांना माहिती मिळाली की आरोपी मनमाड मध्ये आहे. त्यामुळे
त्यांनी पोलिस उपनिरीक्षक दिपक पाठक, योगेश चाहेर, पो.ना. बंडु भागवत, संदीप चव्हाण, नवले, पो.कॉ. किशोर जाधव,
नवनाथ दहिफळे यांच्या पथकाला पाठवून आरोपीला पकडले आहे. न्यायालयाने आरोपीला ४ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
Post a Comment