छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन न झाल्याने सरपंचाने दिला राजीनामा


नगर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशद्ब वापरुन सोशल मिडियावर ऑडिओ क्लिप तयार करुन प्रसारित केली गेली आहे. या मुळे समस्त हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून जनसामन्यांच्या या आक्रोशाचे प्रतिनिधित्व म्हणून नगर तालुक्यातील पोखर्डी गावचे सरपंच रामेश्वर निमसे यांनी मंगळवारी (दि.) आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देत या घटनेचा अनोख्या पद्दतीने निषेध नोंदवला आहे.

नगर शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून समाज विघातक प्रवृत्ती महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्य करत धार्मिक भावना दुखवत आहेत. शनिवारी तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय गलिच्छ भाषेत अपशद्ब वापरून ती क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आली. ही घटना अतिशय वेदनादायी आणि चीड आणणारी आहे. त्या समाजकंटक व्यक्तीवर कठोरातील कठोर कारवाई केली जावी या मागणी साठी आपण समाजाच्या आक्रोशाचे प्रतिनिधित्व म्हणून सरपंच पदाचा राजीनामा देत असल्याचे रामेश्वर निमसे यांनी म्हंटले आहे.

राजीनामा देण्यापूर्वी निमसे यांनी सकाळी साई आनंद लॉन्स  येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पोखर्डी ते नगर मोटारसायकल रॅली काढत शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला. त्यानंतर पंचायत समिती येथे जावून गट विकास अधिकाऱ्यांकडे सरपंच पदाचा राजीनामा सुपूर्द केला. या राजीनामा पत्रावर सूचक म्हणून अजय कराळे तर अनुमोदक म्हणून अंतु वारुळे यांच्या सह्या आहेत. यावेळी निमसे यांच्या समवेत विविध गावांतील पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.  

Post a Comment

Previous Post Next Post