Top News

अहमदनगरमध्ये युवकाला पिस्तूल दाखवत धमकावले



पोलिसांनी दोघांना काही तासांतच कारसह पकडले

अहमदनगर - वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून हाताने मारहाण करून पिस्तूल दाखवत धमकावणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी काही तासात ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आदित्य संजय राठोड (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून, कोतवाली पोलिसांनी आरोपींना निष्पन्न करून मंगळवारी (दि.) रात्री ११ वाजता दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रतीक बळवंतराव ठुबे (वय ३२ रा. आगरकर मळा, अहमदनगर), स्वप्निल प्रकाश रोडे (वय ३३ रा. भूषणनगर केडगाव, अहमदनगर), कैलास शिवाजी शिंदे (रा. हंगा,ता.पारनेर, अहमदनगर) अशी निष्पन्न झालेल्याची नावे आहेत. यातील प्रतीक ठुबे आणि स्वप्निल रोडे या दोघांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आदित्य राठोड हे पुणे येथून नगरकडे येत असताना कायनेटिक चौकात मंगळवारी (दि.) सायंकाळी ७.३० वाजता वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून त्यांना काही जणांनी अडविले. दोन जणांनी शिवीगाळ करत राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने जवळीत पिस्तूल राठोड यांना दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत राठोड यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३४१, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यावर घटनेचे गांभीर्य ओळखून कोतवालीचे पो.नि. चंद्रशेखर यादव यांनी पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवेसंदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांच्या पथकाला आरोपींच्या शोधासाठी तात्काळ रवाना केले. फिर्यादीने सांगितलेल्या कार च्या क्रमांकावरून आरोपी निष्पन्न करण्यात आले व त्यातील दोघांना मंगळवारी (दि.) रात्री ११ वाजता ताब्यात घेतले. या आरोपींकडील कार (क्र. एम.एच.१६ बी.वाय. १५८५) कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post