मुकुंदनगरच्या 'त्या' आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

 


नगर - छत्रपती शिवाजी महाराजांबददल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुकुंदनगरच्या अरमान नईम शेख या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना - भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

याबाबत शिवसेनेचे (शिंदेगट) जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, बाबुशेट टायरवाले, सचिन जाधव, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अँड.अभय आगरकर, संग्राम शेळके, महेश लोंढे, सागर गायकवाड, सुनिल लालबोंद्रे, भारत कांडेकर, काका शेळके, पोपटराव पाथरे, अनिकेत कराळे, मयुर गायकवाड, ओम भिंगारदिवे, शुभम कुलकर्णी, पांडुरंग घोरपडे, दामोदर भालसिंग आदींच्या शिष्टमंडळाने  जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची भेट घेत निवेदन दिले.

यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, सोशल मिडीयावर संभाषण करताना छत्रपती शिवाजी महाराजांबददल अत्यंत हीन व खालच्या पातळीचे वक्तव्य आरोपी अरमान नईम शेख याने केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानच दैवत असून त्यांच्यासारखा राजा जगात कुठलाही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबददल अशाप्रकारचे हिन व निंदनीय व खालच्या प्रकारचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे. तरी सदर आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच अशा प्रकारचे वक्तव्य करण्यास प्रोत्सहन देणाऱ्याचा पोलीसांनी शोध लावावा व कडक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post