नगर - नगर शहरामध्ये दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षढयंत्र करुन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. महापुरुषांची बदनामी करणार्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली.
याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम,
महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेना सहसचिव
विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, सभापती गणेश कवडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे,
संजय शेंडगे, सचिन शिंदे, विजय पठारे, योगीराज गाडे, दत्ता
जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे,
बबलू शिंदे, सुरेश तिवारी, स्मिता अष्टेकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, संतोष गेनप्पा, संग्राम
कोतकर, अशोक दहिफळे, दत्ता कावरे,
संदिप दातरंगे, हर्षवर्धन कोतकर, सुरेश क्षीरसागर, डॉ.श्रीकांत चेमटे, प्रशांत भाले, प्रशांत पाटील, मुन्ना
भिंगारदिवे, गौरव ढोणे, रावजी नांगरे
,अभिजित अष्टेकर ,खेडकर ,अरुण झेंडे, लताबाई पठारे आदिंसह शिवसेनेच पदाधिकारी,
कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या
निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात गेल्या
काही दिवसांपासून महापुरुषांची बदनामी करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
करुन शहरात अशांतता माजविण्याचा डाव केला जात असून, आगामी
काळातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही नेते मंडळी विशिष्ट समाजाला हाताशी धरुन असे
उद्योग करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांना महापुरुषांबद्दल अपशब्द
वापरायला सांगून जातीय तेढ निर्माण करण्यास भाग पाडत आहेत.
असाच प्रकार शनिवारी रात्री मुकुंदनगर
भागातील समाज कंटकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
यांच्याबद्दल अपशद्ब वापरुन सोशल मिडियावर ऑडिओ क्लिप तयार करुन प्रसारित केली.
अशा समाज कंटकाविरोधात देश द्रोहाचा गुन्हा दाखल करुन जिल्ह्यातून हद्दपार केलेच
पाहिजे.अशा समाज कंटकांवर देशद्रोहाचे कलम लावण्यात यावे,
जेणे करुन अशा घटना पुन्हा घडणार नाही, असेही
निवेदनत म्हटले आहे.
यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले,
गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात महापुरुषांबद्दल वादग्रस्त
वक्तव्य करुन समाजा-समाजात तेढ निर्माण करुन वातावरण दुषित करत आहेत. अशा घटनांचे
पडसाद राज्यभर उमटत असल्याने अशा प्रवृत्तीला वेळेच ठेचले पाहिजे. नगरमध्ये
कायद्याचा धाक राहिलेला नाही, तरी शासनाने अशा व्यक्तींवर
देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, जेणे करुन पुन्हा अशा घटना
घडणार नाही. अन्यथा आम्हालाच अशा लोकांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराही
त्यांनी यावेळी दिला.
प्रारंभी एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक करुन मोटारसायल रॅलीस प्रारंभ करण्यात
आला. शहराच्या विविध भागातून ही रॅली काढण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणुन
गेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना
निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
Post a Comment