Top News

नगर-दौड रोडवर भीषण अपघात ; २ ठार, ३ जखमी



नगर - नगर-दौड रोडवर कायनेटिक कंपनीजवळ असलेल्या पांजरपोळ संस्थेजवळ सोमवारी (दि.१४) दुपारी भीषण अपघात झाला असून दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

नगर दौड रोडवर पांजरपोळ संस्थेजवळ कारचा अपघात झाला. कार (क्र.एम.एच.१४ डी.आर.४३००)  नगरच्या दिशेने येत होती. चालकाचा ताबा सुटल्याने कार विरुद्ध दिशेला जाऊन ट्रक वर जोरात आदळली. यात कारचा चक्काचूर झाला. अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर तीन गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post