Top News

नगरच्या नवी पेठ येथील कापड दुकानात भरदिवसा झाली चोरी



नगर - कपडे खरेदीच्या बहाण्याने नगर शहरातील नवीपेठेतील कापड दुकानात आलेल्या २ महिलांनी दुकानातील कर्मचार्‍यांची नजर चुकवून सुमारे १४ हजार रुपये किंमतीचे ७ पंजाबी ड्रेस चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून या २ अनोळखी महिलांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबत रामनिवास जगदीशप्रसाद पारिक यांनी फिर्याद दिली आहे. पारिक यांचे नवीपेठ येथे इंद्रप्रस्थ बिल्डींगमध्ये कृष्णा रेडिमेड नावाचे कापड दुकान आहे. या दुकानात बुधवारी दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास अंदाजे ४५ ते ५० वयाच्या २ अनोळखी महिला या रिक्षाने कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या दोन महिलांनी दुकानातील कामगार महिलांची नजर चुकवून १४ हजार रुपये किंमतीचे ७ लेडीज पंजाबी ड्रेस त्यांच्याकडील पिशवीत घालून कपडे खरेदी न करता निघून गेल्या. 

दुकानातील कपड्यांचा स्टॉक चेक केल्यानंतर काही पंजाबी ड्रेस कमी असल्याचे आढळल्यावर पारिक यांनी दुकानातील सीसीटिव्ही फुटेज् तपासले. त्यावेळी बुधवारी दुकानात आलेल्या दोन अनोळखी महिला पंजाबी ड्रेस चोरुन नेताना दिसून आल्या. त्यामुळे पारिक यांनी शुक्रवारी दि.११ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post