Top News

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल १३.४९ कोटींची फसवणूक



नगर - शेअर मार्केट ट्रेंडिगच्या नावाखाली तब्बल १३ कोटी ४९ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार नगर शहरात समोर आला आहे. कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिन्याला ५ टक्के परतावा देण्याच्या आमिषाने नगर शहरासह राक्यातील २६ जणांची ही फसवणूक करण्यात आली. ठकबाजांनी पैसे परत करण्यास नकार देत गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया (वय ३६, रा. देना बँक कॉलनी, सावेडी रस्ता, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे व निहाल बाळासाहेब काळे (सर्व रा. रूपमाता नगर, सावेडी, अहमदनगर) या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांची सावेडी नाक्यावर इडलवाईज ब्रोकर इंडिया लि. कंपनीची फ्रेंचाइजी होती. त्यांनी प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये आमच्या मार्फत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा तुंम्हाला जादा परतावा मिळवून देवू असे अमिष दाखवले. त्यामुळे सुरपुरिया यांनी त्यांना चेक द्वारे ५ लाख व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण ३२.५ लाख रुपये दिले. सुरुवातीला काही दिवस दरमहा ५ टक्के परतावा त्यांना देण्यात आला. नंतर कराराची मुदत संपल्यावर त्यांनी तुम्ही पैसे काढू नका सध्या मार्केट चांगले असल्याने तुम्हाला चांगले पैसे मिळतील असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून सुरपुरिया व इतरांनी पैसे ठेवले. मात्र काही दिवसांनी त्यांना पैसे मागितले असता त्यांनी ते दिले नाहीत. आम्ही डबघाईला आलो असून आमच्या कडे पैसे नाहीत. तुम्हाला काय कायदेशीर कारवाई करायची ते करा असे सांगितले. त्यामुळे याबाबत सुरपुरिया व इतरांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज केला. त्यावेळी त्यांना समजले की काळे यांनी नगर सह राज्यातील अनेकांचे पैसे थकविलेले आहेत. ही रक्कम सुमारे १३ कोटी ४९ लाख रुपये एवढी आहे.

या सर्वांनी आरोपींना वेळोवेळी बँक खात्यावर व रोख रकमेत १३ कोटी ४९ लाख रुपये दिले. गुन्हा दाखल झालेल्या संशयित ठकबाजांनी शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी इडलवाईज ब्रोकर इंडिया लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्यास महिन्याला पाच टक्के परताव्याचे आमिष दाखवित ही फसवणूक केली. या आमिषाला बळी पडत तक्रारदार यांनी २०२१ ते ऑक्टोंबर २०२२ दरम्यान तब्बल १३ कोटी ४९ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.

याबाबत सर्वांच्या वतीने सुरपुरिया यांनी शुक्रवारी (दि.११) रात्री तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी बाळासाहेब निवृत्ती काळे, भारती बाळासाहेब काळे व निहाल बाळासाहेब काळे (सर्व रा. रूपमाता नगर, सावेडी) यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम 420, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर करीत आहेत.

'या' २६ जणांची झाली आर्थिक फसवणूक

प्रियंका शैलेंद्र सुरपुरिया - ५ लाख माधुरी विष्णुदास पाटील - ५ लाख, विष्णुदास हरिदास पाटील -१७.५ लाख, स्वाती गणेश पाटील - ५ लाख,  सागर रमेश बोगा (रा. तोफखाना अहमदनगर) - ६ लाख रुपये, कल्याणी पद्माकर रच्चा (रा तोफखाना अहमदनगर) - ७ लाख रुपये, श्रध्दा पद्माकर रच्चा (रा तोफखाना अहमदनगर) - ७ लाख रुपये, विद्या अंबादास शिवरात्री (रा छाया टॉकिज अहमदनगर) - ५ लाख रुपये,  हेमंत प्रभाकर सुरकुटला (रा छाया टॉकिज अहमदनगर) - ३ लाख रुपये, कविता पुरुषोत्तम बोगा (रा तोफखाना अहमदनगर) - ३.५ लाख रुपये, अक्षय सहादु आंबेकर (रा बालकाश्रमरोड अहमदनगर) - ५ लाख रुपये, सुयोग दत्तात्रय करपे (रा बोल्हेगांव फाटा) - ५ लाख रुपये, विक्रम गव्हाणे (रा सुपा, पारनेर) - ३ लाख रुपये,  सुनिल चंद्रकांत मानकर (रा आदर्शनगर कल्याणरोड अहमदनगर) यांची २ लाख रुपये, शोभा मुनेश म्याना (रा शेरकर गल्ली अहमदनगर) यांची ३ लाख रुपये, मदन ग्यानोबा अंक्कम (रा नाशिक) यांची १२ लाख रुपये, रमेश लक्ष्मणराव बोगा (रा तोफखाना अहमदनगर) यांची १ लाख रुपये, संजय पेंटय्या कंडेपल्ली (रा माळीवाडा अहमदनगर) यांची २ लाख रुपये, नारायण भैरी (रा दिल्लीगेट अहमदनगर) यांची २ लाख रुपये, सुहास शिवाजी जाधव (रा देगांव फाटा, सातारा) यांची २ कोटी रुपये, संतोष पोपट माने (रा फलटण ता फलटण जि सातारा) यांची ७ कोटी रुपये,  अमोल श्रीरंग माने (रा भोर जि पुणे) यांची २ कोटी रुपये, जीवन बबन जाधव (रा. देगांव फाटा ता. सातारा) यांची ६० लाख रुपये,  विठठल साहेबराव शेळके (रा शेळकेवाडी ता जि सातारा) यांची १० लाख रुपये, आप्पा बबन जाधव (रा कुंडाळ ता जावळी जि सातारा) यांची ४० लाख रुपये, प्रितम सोनाजी जाधव (रा. कुंडाळ ता जावळी जि सातारा) यांची ४० लाख रुपये अशी एकूण २६ लोकांची फसवणुक झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post