गणेशोत्सवात एकता प्रतिष्ठानचे विविध सामाजिक उपक्रम

नगर - सावेडी उपनगरातील प्रेमदान हडको येथील एकता प्रतिष्ठान ट्रस्टने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवत गेल्या ३१ वर्षांपासून सुरु असलेली परंपरा जपली आहे.

सावेडी उपनगरातील प्रेमदान हडको येथील एकता प्रतिष्ठान ट्रस्ट हे सर्वात जुने मंडळ असून या मंडळाचे हे ३१वे वर्ष आहे. या मंडळाने दोन वेळा उत्कृष्ट मंडळ म्हणून पोलीस प्रशासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. तसेच अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवले आहे.

मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशी भव्य मिरवणूक, त्यात महिलांचा उत्तम असा प्रतिसाद असतो. या शिवाय दहा दिवस महिला, मुली, बालके, तरुणवर्ग यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करत सर्वांच्या कलागुणांना वावही दिला जात आहे.

नगरमध्ये सर्वात वेगळी गणेश मूर्ती स्थापना करण्यात येते. यावर्षीही कार्तिक स्वामी च्या रूपातील गणेश मूर्तीची स्थापना या मंडळाने केली असून चांगला पाऊस पडावा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद यावा बळीराजा सुखी व्हावा यासाठी या मंडळाने 'हनुमान चालीसा' चा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच सर्वांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post