नगर -
नगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या भिंगार येथील गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी (दि.२६)पारपडत आहे. या मिरवणुकीसाठी
पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, मिरवणूक मार्गावर कडेकोट
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अशी माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक
पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी दिली. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते
मानाच्या देशमुख गणपतीची उत्थापन पूजा दुपारी होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
भिंगार येथे प्रथेप्रमाणे आठव्या
दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते. मंगळवारी (दि.२६) दुपारी बारा वाजता ब्राम्हणगल्लीतील देशमुख
गणपती मंदिरातील मानाच्या गणपतीची उत्थापन पूजा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या
हस्ते झाली. यावेळी समीर देशमुख, कार्तिक देशमुख, आशु देशमुख, प्रज्वल देशमुख, अक्षय
देशपांडे, स्वप्निल मुळे, शिवाजी राऊत,
अनिल भोसले, राजेश तनपुरे, मोरेश्वर मुळे, अनिल मुळे, भिंगार
शहर राष्ट्रवादीचे संजय सपकाळ सोपान साळुंखे, श्याम वागस्कर,
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे
उपस्थित होते. त्यानंतर गणेशाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने
फुलांनी सजविलेली पालखीमध्ये काढण्यात आली. या पालखीला पोलिस अधिक्षक ओला यांनी
खांदा देत मिरवणुकीस प्रारंभ केला.
त्यानंतर सायंकाळी विविध गणेश
मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. या परिसरातील एकूण १८ सार्वजनिक गणेश
मंडळांचा मिरवणुकीत सहभाग असेल. या मिरवणुकीसाठी मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात
आलेला आहे. विविध ९७ पोलीस अधिकारी तसेच होमगार्ड आणि राज्य राखीव दलाचे पथकही
मिरवणूक मार्गावर तैनात असणार आहेत.
Post a Comment