Top News

नगरमध्ये मुगाला मिळाला प्रतिक्विंटल १० हजार ८४१ रुपये उच्चांकी भाव



नगर - नगर बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या मुगाला सोमवारी (दि.२१) उच्चांकी भाव मिळाला आहे. नगर बाजार समिती मधील भुसार बाजारात प्रतिक्विंटल १० हजार ८४१ रुपये या उच्चांकी दराने मुगाचा लिलाव झालेला आहे. उच्च प्रतीच्या मुगाला एवढा भाव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

नगर तालुक्यातील सारोळा कासार गावातील शेतकरी रमेश भानुदास धामणे यांनी सोमवारी (दि.२१) आपल्या शेतात उत्पादित झालेला ७ कट्टे मुग विक्रीसाठी नगर बाजार समितीत भुसार बाजारात आणला होता. सचिन केशवराव वाघ यांच्या अडतीवर झालेल्या लिलावात धामणे यांच्या उच्च प्रतीच्या मुगाला प्रतिक्विंटल १० हजार ८४१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे सचिन वाघ यांनी रमेश धामणे यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी गावातील राजु धामणे, बंडू धामणे, मंगेश धामणे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. 

दरम्यान नगर बाजार समितीतील भुसार बाजारात सोमवारी शेतकऱ्यांनी १२३ क्विंटल मुग विक्रीसाठी आणला होता. त्यास प्रतवारी नुसार ५ हजार ते ९ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.  तसेच शेतकऱ्यांनी तोडणीला आलेला मूग लवकरात लवकर तोडून बाजारात विक्रीसाठी आणावा व जास्त दराचा फायदा घ्यावा.असे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post