'या' शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांचा नादच खुळा


सुनिल हारदे (अहमदनगर) 

नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलांना ज्ञानदान करण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये अनेकजण वेगवेगळे उपक्रम राबवत आपले वेगळेपण दाखवून देत आहेत. अशाच प्रकारचा एक आगळा वेगळा प्रयोग श्रीगोंदा तालुक्यातील तरडगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी केला आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील तरडगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी अगोबाई डगोबाई, इथे काय रुजते, रानातल्या बोरीला या मराठी कवितांच्या तसेच देव बोलाय लागला बानूला या लोकगीतावर सादर केलेले अप्रतिम असे लेझीम नृत्य उपस्थितांची दाद मिळवून गेले.विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने उपस्थित गावकरी मंत्रमुग्ध झाले.  

प्रारंभी प्रभातफेरी काढली, ग्रामपंचायत, शाळेतील ध्वजारोहन केल्यानंतर शाळेत आजी - माजी सैनिकांचा सत्कार केला. त्यानंतर सांकृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. लोकगीतांवर लेझीम नृत्य करणारे विद्यार्थी व शिक्षक अकबर तांबोळी यांचा गावकऱ्यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून तो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल केला.

या कार्यक्रमसाठी गावातील आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, तरुण मंडळ, कारखाना डायरेक्टर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी उपस्थित होत्या. शाळेतील शिक्षक भारत जावळे सर व अकबर तांबोळी सर यांनी सर्व कार्यक्रम बसवले होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी गावकऱ्यांनी या दोन्ही उपक्रमशील शिक्षकांचा सत्कार केला. 

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा 

https://www.facebook.com/100002444547012/videos/1341813173371343/ 

Post a Comment

Previous Post Next Post