नगर - देशभरातील
लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास एक
इमर्जन्सी अलर्ट आला. हा प्रकार नक्की काय? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र
हा केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास
देशभरातील नागरिकांना एकाच वेळी संदेश देता यावा यासाठीची चाचणी असल्याचे सांगितले
जात आहे.
सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक
मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला.
यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात
हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचे सांगण्यात
आले. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज
व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला. आपतकालीन संदेशातील ओके बटनावर
क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं.
तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.
अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या
चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली
नव्हती. त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण
झाला होता. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट
जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये,
किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या
यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती
निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. सकाळी
१०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला.
त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून
जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.
सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्ती विषयी
एसएमएस पाठवून सूचना दिली जाते. मात्र लोक
ते वाचत नाहीत; गांभीर्याने घेत नाहीत; असे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना
असे इमर्जन्सीअलर्ट पाठवण्याची ही चाचणी होती, असे सांगितले जात
आहे. यामुळे तुम्ही नेटवर्क
कव्हरेजच्या बाहेर असाल, तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर असेल,
तरीही तुम्हाला इमर्जन्सी अलर्ट मिळेल. तुमचा फोन
व्हायब्रेट होईल.तसेच मोबाईलची रिंगटोन फूल व्हॉल्यूम वर वाजेल.
त्यामुळे धोक्याच्या इशाऱ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकणार नाही.
हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या संदर्भात नगर मधील बीएसएनएलचे उपविभागीय
अभियंता गणेश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन
विभागाने हा अलर्ट जारी केला होता. असे सांगत
यात घाबरण्याचे कारण नाही, ही आपत्कालीन संदेशाची चाचणी होती.
मात्र ही चाचणी बीएसएनएलने नव्हे तर जिओ तर्फे करण्यात आल्याचेही त्यांनी
सांगितले.
Post a Comment