नगर
- गोवा राज्यातून नगर जिल्ह्यात विक्रीसाठी
बेकायदेशीरपणे आणलेला विदेशी दारूचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त
केला आहे. १२ लाख ४४ हजाराची दारू व १५ लाखाचा टेम्पो असा एकुण
२७ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
नगर
कल्याण रस्त्यावर नेप्ती नाका येथे बुधवारी (दि.१९)सायंकाळी ही
कारवाई केली. याप्रकरणी बाबु लखुभाई राठोड (वय २५ रा. गुजरात) व सिध्देश संदीप
खरमाळे (वय २६ रा. भांडगाव ता. पारनेर) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
पो.नि. दिनेश
आहेर यांना बुधवारी (दि.१९) दुपारनंतर गोपनीय माहिती मिळाली की, एका आयशर कंपनीचे
विटकरी रंगाचे टेम्पोमधुन गोवा राज्यातुन विदेशी कंपनीची दारु महाराष्ट्रात विक्रीचा
परवाना नसतानाही बेकायदेशिरित्या नगर कल्याण रोडने नगर कडे येत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.नि.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई साठी पाठविले. या पथकाने नेप्ती नाक्याजवळ सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात एक विटकरी
रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला. पथकाने तो थांबवून टेम्पोची
पाहणी केली असता त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या
विदेशी दारुचे बॉक्स असल्याचे दिसून आले.
या टेम्पो
तील बाबु राठोड व सिध्देश खरमाळे यांच्याकडे विदेशी दारु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस
करता त्यांनी वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले. टेम्पो मध्ये ३ लाख ४५ हजार ६००
रुपये किंमतीचे मॅकडॉल्स व्हीस्कीचे १८० मिली बाटल्यांचे ४८ बॉक्स, ३ लाख ४५ हजार ६०० रुपये किंमतीचे मॅकडॉल्स व्हीस्कीचे ७५० मिलीचे बाटल्यांचे
४८ बॉक्स, १ लाख ९० हजार
८० रुपये किंमतीचे रॉयल स्टँग व्हीस्कीचे १८० मिली बाटल्यांचे २२ बॉक्स, १ लाख ९० हजार ८० रुपये किंमतीचे
रॉयल चॅलेज व्हीस्कीचे ७५० मिलीचे बाटल्यांचे २२ बॉक्स, १ लाख
७२ हजार ८०० रुपये किंमतीचे रॉयल चॅलेज व्हीस्कीचे १८० मिली बाटल्यांचे २० बॉक्स आढळून
आले. त्यामुळे या पथकाने १२ लाख ४४ हजाराची दारू व १५ लाखाचा
टेम्पो असा एकुण २७ लाख ४४ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
जिल्हा
पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे,
पो.हे.कॉ.संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र
शेलार, पो.ना.रविंद्र
कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे,
संतोष लोढे, संदीप दरदंले, संतोष खैरे, फुरकान शेख, पो.कॉ.रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे,
किशोर शिरसाठ, अमृत आढाव, मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Post a Comment