Top News

एमआयडीसी परिसरात कारच्या दरवाजाची काच फोडून 1 लाख 82 हजारांची रोकड पळविली



अहमदनगर - बँकेसमोर उभ्या असलेल्या कारमधून 1 लाख 82 हजार रूपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना एम आयडीसीतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोर बुधवारी (दि. 9) दुपारी सव्वा तीन वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शशिकांत गजानन वांढेकर (वय 34 रा. शेंडी बायपास रस्ता, वडगाव गुप्ता, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. वांढेकर यांनी बुधवारी (दि.9) नगर मधील 2 बँकांमधून काही रोकड काढली व दुपारी सव्वा तीन वाजता ते एमआयडीसीत गेले. तेथे असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेसमोर त्यांची कार (एमएच 05 बीएस 4397) पार्क केली होती. त्या कारमध्ये 1 लाख 82 हजार रूपयांची रक्कम होती. चोरट्यांनी कारच्या दरवाजाची काच फोडून आतमधील रक्कम असलेली पिशवी पळवून नेली. वांढेकर यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पाहत चोरट्यांचा शोध सुरु केला. या प्रकरणी वांढेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post