Top News

व्यापार्‍याची फसवणूक करणार्‍या आरोपीला पोलिसांनी पकडले





अहमदनगर - कोल्ड्रींक्सचे वितरक असलेल्या व्यापार्‍याला फसवून कोल्ड्रींक्सचे विविध प्रकारचे बॉक्स घेवून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून या आरोपीला 4 महिन्यांनी पकडण्यात आले आहे. ऋषीकेश कैलास वंजारी (रा. गदेवाडी, ता. शेवगांव) असे आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. 

पारनेर येथील वैभव प्रदीप औटी ( वय 23, रा. कोर्ट गल्ली, ता. पारनेर) यांना दि.3 एप्रिल 2023 रोजी अनोळखी इसमाने फोन करुन महावीर सुपर शॉपी टाकळी ढोकेश्वर येथे कोल्ड्रींक्सचे विविध प्रकारचे बॉक्सची ऑर्डर दिली. तसेच पुन्हा फोन करुन कोल्ड्रींक्सचे बॉक्स गोडावुनमध्ये ठेवायचे आहे असे म्हणुन त्यांना रस्त्यात थांबवुन एका पांढरे रंगाचे पिकअप मधील दोन अनोळखी इसमांना विविध प्रकारचे कोल्ड्रींक्सचे बॉक्स देण्यास सांगितले. त्यानंतर औटी हे ढाकळी ढोकेश्वर येथील महावीर सुपर शॉपी येथे उर्वरीत कोल्ड्रींगचे बॉक्स देण्यास गेले असता संबंधीत दुकानदाराने कोणत्याही प्रकारची ऑर्डर दिली नसल्याचे सांगितल्याने औटी यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत पारनेर दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, सदर गुन्हा ऋषीकेश वंजारी याने केला असुन तो त्याचे गांवी आला आहे. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेतील स.फौ.भाऊसाहेब काळे, पो.हे.कॉ.मनोहर गोसावी, विजय वेठेकर, शरद बुधवंत, पो.ना.रविंद्र कर्डीले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, पो.कॉ.रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, चालक पो.हे.कॉ. अर्जुन बडे यांच्या पथकाने तात्काळ गदेवाडी येथे जावुन संशयीत इसम ऋषीकेश वंजारी याला ताब्यात घेतले. त्याचेकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला पुढील कारवाईसाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post