आरोग्य विभागाच्या निषेधार्थ नागरिकांसह महिलांनी केली महापालिकेत धूर फवारणी
अहमदनगर - शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर
मलेरिया, डेंगूसारख्या साथीच्या आजाराचा
प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे संपूर्ण नगर शहर विविध आजारांनी ग्रासले आहे,
मात्र याकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळेच
नागरिक सर्दी खोकला, थंडी ताप यासारख्या साथीच्या आजाराने त्रस्त
झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या
निषेधार्थ महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला व नागरिकांसह धूर
फवारणी आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित
खोसे व शहर महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत धूर फवारणी
करण्यात आली आहे. यावेळी सुमित कुलकर्णी, अंजली
आव्हाड, इंजि.केतन क्षीरसागर, गजेंद्र भांडवलकर,
निलेश बांगरे, राजेंद्र तागड, तुषार यादव, महेंद्र कवडे, राजू
कोकणे, खंडू काळे, आनंदराव गारदे,
महेश निमसे, सैफ अली शेख, अरबाज बागवान, सुरज शिंदे, सागर
शिंदे, मुसला धनगर, दत्ता शिंदे,
आकाश शिंदे, शिवम भंडारी, विशाल मस्के, वैभव म्हस्के, अक्षय
भिंगारदिवे, वैभव शेवाळे, पवन कुमटकर,
वैशाली गुंड, सुरेखा कडूस, निर्मला जाधव, किरण कटारिया, सुनंदा
कांबळे, निर्मला जाधव, शितल राऊत,
दिपाली आढाव, सुनिता पाचारणे, शितल राऊत, अपर्णा पालवे, जॉय लोखंडे
आदी उपस्थित होते.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून,
यात साथीचे आजार पसरतच असतात मात्र याकडे लक्ष देत मनपाने शहरात धूर
फवारणी औषध फवारणी करणे, योग्य उपाययोजना करणे गरजेचे होते मात्र
मनपाने तसे न करता साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरात डासांचे प्रमाण वाढलेले दिसून
येत आहे आणि यामुळे साथीचे रुग्ण वाढले आहे. साथीचे आजार आटोक्यात येण्यासाठी अहमदनगर
महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अपयशी ठरत आहे. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे
नगरकरांवर या साथीच्या आजाराचे संकट ओढावले आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी मनपा आयुक्त
यांना आम्ही निवेदनाद्वारे सूचित केले होते की, अहमदनगर शहरात
साथीच्या आजारांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. तातडीने संपूर्ण शहरामध्ये
धूर फवारणी व औषध फवारणी करणे गरजेचे आहे, परंतु अहमदनगर महानगरपालिकेच्या
आरोग्य विभागाने शहरामध्ये कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली दिसून येत नाही.
आरोग्याधिकारी यांचे आरोग्य विभागाकडे
पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचेच दिसून येत आहे. फक्त आंदोलनकर्त्यांच्या घरात व ऑफीसच्या
ठिकाणी धुरफवारणी व औषध फवारणी केली जाते व त्यातही कोणत्याही पद्धतीचे सातत्य दिसून
येत नाही. केवळ आरोग्य अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळेच संपूर्ण अहमदनगर शहर हे साथीच्या
आजाराने ग्रासलेले आहे. वास्तविक पाहता पावसाळा सुरु झाल्यापासूनच धूर फवारणी व औषध
फवारणी संपूर्ण शहरामध्ये केली असती तर आज साथ रोग आजार वाढले नसते,
आरोग्य अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेुळे सर्व योजना या फक्त कागदावरच
दिसतात व प्रत्यक्ष या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत नसल्याने ते वंचीत राहतात.
सध्या संपूर्ण नगर शहर साथीच्या आजाराच्या विळख्यात सापडले आहे. तरी अहमदनगर महानगरपालिका
हद्दीमध्ये धूर फवारणी, औषध फवारणी सुरु करून त्यात सातत्य ठेवावे
जेणे करून साथ रोग आटोक्यात येईल व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या
वतीने करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष अभिजित खोसे म्हणाले
की, तातडीने शहरात धूर फवारणीचे काम सुरु करा,
मनपा आरोग्य विभाग नगर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. आरोग्य
विभागात विविध पदावर सक्षम अधिकारी नसल्याने नागरिकांना उपचार मिळत नाही. आरोग्य विभागात
बायोलॉजीस्ट, जीवशास्त्रज्ञ, हिवताप पर्यवेक्षक,
किटकसंहारक, वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता आदी पदे
रिक्त आहे. धूर फवारणीसाठी मे महिन्यातच हंगामी ५० कर्मचारी घेतले जातात, मात्र यावर्षी वेळेवर न घेतल्याने शहरात धूर फवारणी झाली नाही, त्यामुळे साथीचे आजार पसरले आहे. अतिरिक्त आयुक्तांना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने
निवेदन दिले, यावेळी यावर तात्काळ उपाययोजना केली जाईल असे त्यांनी
सांगितले.
अहमदनगर शहरात डेंगूचे रुग्ण वाढले असून, त्यात अनेक रुग्णाना जीव गमवावा लागतो, याची सर्व माहिती शासनाला देणे बंधनकारक असते. मात्र, मनपा आरोग्य विभागाच्यावतीने जाणीवपूर्वक ही सर्व माहिती लपवली जाते. डेंगू, मलेरिया या आजारावर बायोलॉजीस्ट पदवी असणारे डॉक्टर भरावे लागते, मात्र, आरोग्य विभागाच्या वतीने जाणूनबुजून हे पद भरले नसून या पदावर बीएचएमएस असणारे डॉक्टर काम करत आहे.
Post a Comment