अहमदनगर - आगडगाव येथील श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानमध्ये अधिक महिन्याच्या निमित्ताने 600 जावयांच्या तर्फे धोंडा जेवन हा महाप्रसाद देण्यात आला. याची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली असून, तसे प्रमाणपत्र इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डस चे आंतरराष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी देवस्थानला दिले. अधिक महिन्यात अन्नदानाला महत्त्व असते. या महिन्यात जावयांना धोंडा जेवण देण्याची पद्धत आहे. तथापि, देवस्थानच्या वतीने जावयांतर्फे धोंडा जेवण असा उपक्रम राबविला. रविवारी सकाळपासून जावयांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सर्व अन्नदात्यांना पाची पोशाख, साडी, चांदिचा शिक्का, ताट, निरांजनी अशा भेटवस्तू देवस्थानच्या वतीने भेट देण्यात आल्या. सर्व भाविकांना धोंडा, पुरणपोळी, आमटी, भात, कुरडई, पापड, लापशी असा महाप्रसाद देण्यात आला. त्यासाठी सुमारे 200 महिला सकाळपासून पोळ्या बनविण्याचे काम करीत होत्या. गर्दीमुळे आगडगाव रस्तावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. सुमारे 500 मुलांनी जेवण वाढण्याची सेवा दिली. एसटी महामंडळाच्या जादा बस सोडण्यात आल्या होत्या. रविवारी (6 जुलै 2013) रोजी सुमारे 20 हजार भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. हा उपक्रम विक्रमी ठरला. सर्व अन्नदात्यांना पाची पोशाख, साडी, चांदिचा शिक्का, ताट, निरांजनी अशा भेटवस्तू देवस्थानच्या वतीने देण्यात आल्या.
‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये 600 जावयांतर्फे धोंडा जेवणाची नोंद
Nava Maratha
0
Post a Comment