अहमदनगरमध्ये तरुणावर मित्रानेच केला चाकूने जीवघेणा हल्ला


जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

अहमदनगर - अज्ञात करणातून एका ३० वर्षीय तरुणावर त्याच्या मित्रानेच चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना नगर शहरातील मार्केट यार्ड चौकाजवळील एका पेट्रोल पंपाजवळ रविवारी (दि.) सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडली. सागर दत्तात्रय जाधव (वय ३०, रा. निंबोडी ता.नगर) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर नगर कॉलेज जवळील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर रामा छोटु इंगळे (रा. निंबोडी ता. नगर) असे हल्लेखोराचे नाव आहे.  

जखमी सागर जाधव हा निंबोडी गावातील जयराम बेरड यांचे खडी क्रेशर कारखान्यावर मॅनेजर म्हणुन नोकरी करतो. रविवारी (दि.) सुट्टी असल्याने तो पत्नीसह नगरमध्ये खरेदी करण्यासाठी आला होता. दुपारी ४.१५ च्या सुमारास त्याचा मित्र रामा इंगळे याने त्याला मोबाईल वर फोन केला आणि फोनवर तो म्हणाला की, सागरभाऊ माझे तुझ्याकडे काम आहे, तु कोठे आहेस असे त्याने विचारल्यावर सागरने त्याला मी नगरमध्ये आलेलो आहे, सांग काय काम आहे. असे म्हणाल्यावर म्हणाला की, मी फोनवर बोलु शकत नाही समोरासमोर भेटुन बोलतो असे म्हटल्यावर सागरने त्याला सांगितले की, मला यायला वेळ लागेल.

त्यानंतर परत ५.२० च्या सुमारास त्याने फोन केला आणि मला तुला भेटायचे आहे असे तो म्हणाला तेव्हा सागरने त्याला मी माळीवाडा येथे आहे असे सांगितले. त्यावेळी तो म्हणाला की, मी नेवासकर पेट्रोलपंपाजवळ आलो आहे, माझे पेट्रोल संपले आहे, तुला यावा लागेल तु माझा भाऊ आहेस की नाही असे तो फोनवर म्हणाल्याने सागर त्याच्या मोटारसायकल नेवासकर पेट्रोपंप येथे पोहचलो आणि ५.३० च्या सुमारास तेथे रामा इंगळे त्याला भेटला.

तेथे सागर त्याला म्हणाला की, बोल काय काम आहे तेव्हा तो म्हणाला की, आपण थोडे बाजुला जावुन बोलु असे म्हणुन त्याने सागरच्या गळ्यात हात घातला आणि तेथे त्याचेसोबत बाजुला जात असताना त्याने अचानक त्याचेजवळील चाकू काढला आणि सागरच्या पोटात खुपसला त्यामुळे त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली व तो खाली पडला.

तेथे रस्त्यावर असलेले त्याचे ओळखीचे संदिप सगळगीळे व यश या कोठी येथे राहणारे मुलांनी त्याला तातडीने उपचारासाठी नगर कॉलेज जवळील रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेत असताना सागर याने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबात सदर घटना सांगितली. सागरच्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी हल्ले खोर रामा छोटु इंगळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला पोलिसांनी निंबोडीतून केली अटक 

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयातील फरार झालेला आरोपी हा निंबोडी येथे गेला असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांचे एक पथक निंबोडी गावात गेले व त्यांनी आरोपी रामा अंकुश इंगळे याला पकडले.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, योगेश खामकर, रियाज इनामदार, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाडे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे अतुल काजळे, सागर मिसाळ मोबाईल सेलचे पो.कॉ. नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post