नगर - कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेवून जाणार्या
संशयीत वाहनाचा पाठलाग करुन पोलिसांना माहिती देणार्या ३ गोरक्षकांवर १० ते १२
जणांच्या जमावाने हल्ला करत त्यांना दगड फेकून मारल्याची घटना गुरुवारी (दि.३)
रात्री १०.३० च्या सुमारास नगर शहरातील चांदणी चौक परिसरात असलेल्या आरटीओ
कार्यालयासमोर घडली. या हल्लेखोरांपैकी दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ
अटक केली आहे.
याबाबत गोरक्षक असलेले चांगदेव गोरख भालसिंग (वय ३१, रा.धोंडेवाडी, वाळकी, ता.नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भालसिंग हे गोरक्षक म्हणून काम करतात. गुरुवारी (दि.३) रात्री ते त्यांचे सहकारी अविनाश सतिश सरोदे (रा.वाळूंज, ता.नगर), मनोज फुलारी (रा.शिराढोण, ता.नगर) असे त्यांच्या मोटारसायकलवरुन नगरहून शिराढोणकडे नगर-सोलापूर महामार्गाकडून जात असताना १ संशयीत चारचाकी वाहन (क्र.एम.एच.१६, ए.वाय.६७१०) नगरकडे येत असतानात यांना दिसले.
या वाहनात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेवून जात असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांनी सदर वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने ते न थांबवता भरधाव वेगात नगरकडे पळविले. या गोरक्षकांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी सदरचे वाहन स्टेट बँक चौकातून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याने गेले. त्यावेळी ही माहिती त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यातील त्यांच्या ओळखीच्या पोलिस कर्मचार्यास कळविली व ते चांदणी चौकातील आरटीओ कार्यालयासमोर जावून थांबले.
काही वेळात तेथे निहाल कुरेशी, गुरफान
कुरेशी (दोघे रा.झेंडीगेट) हे व त्यांच्यासोबत अनोळखी १० ते १२ जण मोटारसायकलवर
तेथे आले. या टोळक्याने तिघा गोरक्षकांना आल्या बरोबर लाथाबुक्क्यांनी मारहाण
करण्यास सुरुवात केली तसेच त्यांना दगड फेकून मारले. त्यामुळे तिघेही जखमी झाले.
या टोळक्याने जाताना भालसिंग यांचा मोबाईल व त्यांच्या एका सहकार्याचा मोबाईल असे
२ मोबाईल तसेच मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेले १ हजार रुपये घेवून गेले. त्यानंतर
काही वेळात भिंगार कॅम्प पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांना
उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दोघा
हल्लेखोरांना पकडले
रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर भालसिंग यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात जावून पहाटेच्या सुमारास फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी निहाल कुरेशी, गुरफान कुरेशी यांच्यासह १० ते १२ जणांच्या टोळक्यावर भा.दं.वि.क. ३२७, ३३६, ३३७, १४३, १४७, ५०४, ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच स.पो.नि. दिनकर मुंडे, पोलिस
उपनिरीक्षक किरण सोळंके, मंगेश बेंडकोळी, पो.हे.कॉ. संदीप
घोडके, रेवणनाथ दहिफळे, बबन बेरड, पो.ना.
दीपक शिंदे, राहूल द्वारके, अमोल आव्हाड यांच्या
पथकाने तातडीने कारवाई करत हल्लेखोरांना शोधण्याची मोहित सुरू केली. त्यातील मुख्य
आरोपी असलेले निहाल कुरेशी व गुरफान कुरेशी या दोघांना अटक केली.
Post a Comment