Top News

'संदेसे आते है' या गाण्यावर चिमुकल्यांचे अप्रतिम लेझीम नृत्य


अहमदनगर - स्वातंत्र्य दिनानिमित्त नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी 'संदेसे आते है' या गितावर सादर केलेले अप्रतिम असे लेझीम नृत्य उपस्थितांची दाद मिळवून गेले.विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराने उपस्थित गावकरी मंत्रमुग्ध झाले. 

प्रारंभी स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील शहीद जवान कै.राहुल बबन कडूस यांच्या मातोश्री सौ. आशाबाई बबन कडूस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात, देशभक्तीपर घोषणा देत, लेझीम पथकाद्वारे संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढली. संदेसे आते है या देशभक्तीपर गाण्याच्या तालावर विद्यार्थ्यांनी केलेले लेझीम नृत्य गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

त्यानंतर शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थांसाठी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. तब्बल ४९ विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेवून आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे निवृत्त शिक्षक शिवाजी कडुस होते.तर यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल काळे, नानासाहेब धामणे, नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल हारदे यांच्यासह पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी गावातील पालक, ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. शाळेच्या भौतिक सुविधासाठी व मुलांच्या खाऊसाठी पालकांनी भरपूर अशी देणगी दिली.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या भौतिक सुविधांसाठी, मुलांच्या खाऊसाठी पालकांनी देणगी दिली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक रमजान शेख, उपक्रमशिल शिक्षक वैजिनाथ धामणे, बाबासाहेब धामणे, सविता लोंढे, ज्योती धामणे यांनी या कार्यक्रमांसाठी परिश्रम घेतले.

यावेळी शकील शेख - २०१ रुपये, बाबासाहेब फकिरा धामणे - ५०० रुपये, नानासाहेब धामणे गुरुजी - २०० रुपये,  अतुल बन्सी काळे -११०० रुपये, शिवाजी कडूस गुरुजी -५०० रुपये,  छायाताई हारदे -१००० रुपये, कै. मंदाकिनी कडूस यांच्या स्मरणार्थ पवन कडूस - ५०० रुपये, शिवाजी धामणे - ५०० रुपये, वर्षा नवनाथ धामणे -१००० रुपये,  दीपक जनार्दन कडूस - ५०० रुपये, राहुल गोरक्ष काळे-५०० रुपये, आलमगीर शेख - २५० रुपये, विकास एकनाथ लिंभोरे -२५० रुपये, दिलीप भोसले -१०० रुपये, शिवाजी नानाभाऊ कडूस -१००० रुपये, सौ. अश्विनी सुनील हारदे -१००० रुपये अशी देणगी शाळेसाठी जमा झाली. 

अप्रतिम लेझीम नृत्य पहा व्हिडीओ
https://www.facebook.com/100002444547012/videos/679699876926898/


Post a Comment

Previous Post Next Post