सुयोग पवार हे जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. शनिवारी (दि.५) दुपारी ते कामाच्या ठिकाणी असताना त्यांना एका कर्मचाऱ्याने सांगितले की, नर्सिंग कॉलेज येथे काही लोक जमा झाले आहे. तेव्हा पवार व त्यांचे सहकारी गणेश सासवडे, नाना शिंदे, दिपक जाधव, अतुल ससाणे असे सदर ठिकाणी गेले असता तेथे महेश बिरजु रोकडे, अनिकेत मनसुख खंडागळे व इतर चार ते पाच अनोळखी इसम बसलेले होते, तेव्हा त्यांना विचारले की तुम्ही येथे काय करता तेव्हा ते म्हणाले की आम्ही बसलो आहोत, तर तुम्हाला काय अडचण आहे? तेव्हा पवार त्यांना म्हणालो की येथे लेडीज होस्टेल आहे. तुम्ही येथे थांबू नका. असे म्हणाल्याचा त्यांना राग आला त्यांनी पवार यांना लाथा बुक्यांनी, लाकडी दांडक्यांनी व धारदार वस्तुने मारहाण केली. या मारहाणीनंतर ते टोळके पळून गेले. जखमी झालेल्या पवार यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांनी रविवारी (दि.६) उपचार घेत असताना दिलेल्या जबाबा वरून तोफखाना पोलिसांनी महेश बिरजु रोकडे, अनिकेत मनसुख खंडागळे (रा. लालटाकी) व इतर चार ते पाच अनोळखी जणांविरुद्ध भा.दं.वि.कलम ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment