अहमदनगर – माजी महापौर अभिषेक कळमकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभारी
अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांनी या निवडीची घोषणा शनिवारी (दि.२२) सायंकाळी केली आहे. याच बरोबर अहमदनगर शहर
प्रभारी कार्याध्यक्ष पदी नामदेवराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर महापालिकेचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शनिवारी (दि.२२) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे सादर केला. शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर कळमकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशा जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर हेही उपस्थित होते. राष्ट्रवादीकडून अभिषेक कळमकर यांच्यावर लवकरच पक्षाची मोठी जबाबदारी टाकणार असल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानंतर अवघ्या काही तासांतच कळमकर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभारी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबतच अहमदनगर शहर प्रभारी कार्याध्यक्ष पदी माजी नगरसेवक नामदेवराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Post a Comment