नगर - नगर
तालुक्यातील शेंडी गावच्या शिवारातून फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा एमआयडीसी
पोलीसांच्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत शोध घेवून त्या मुलीला पालकांच्या स्वाधीन
केले आहे. तिला पळवून नेणारा युवक पसार झाला असून पोलिस त्याचा
शोध घेत आहेत. ची
शेंडी येथील संबंधित अल्पवयीन मुलीच्या
वडिलांनी रविवारी (दि.२३) एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की,
त्यांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने कशाची तरी फुस लावून शनिवारी
(दि.२२) पळवून नेले
आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध भा.दं.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल
केला. गुन्हा दाखल होताच स.पो.नि. राजेंद्र सानप यांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवत
एक पथक तपासकामी रवाना केले. तसेच मोबाईल सेलच्या मार्फत तांत्रिक
विश्लेषणाद्वारेही तपास सुरु केला. हा तपास करत असतांना स.पो.नि. सानप यांना माहिती मिळाली
की, सदरची अल्पवयीन मुलगी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे
आहे. ही माहिती मिळताच त्यांनी पथक तिकडे पाठविले. या पथकाने तेथे जावून सदर अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिला ताब्यात घेतले.
तिला नगरमध्ये आणून पालकांच्या ताब्यात दिले.
दरम्यान तिला पळवून नेणारा पसार झाला असून
पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सदरची कामगिरी
स.पो.नि. राजेंद्र
सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.कॉ. जयशिंग शिंदे, किशोर जाधव, सुरज देशमुख नवनाथ दहिफळे, प्रशांत धुमाळ 'यांच्या पथकाने केली आहे.
Post a Comment