Top News

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे; प्रवरा नदीत विसर्ग सुरु



भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने धरणातील पाणीसाठा ८१ टक्के झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यात येत असून धरणातून सोमवारी (दि.२४) पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे.त्यामुळे भंडारदरा धरण ओहरफ्लो झाले आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी (दि.२४) रोजी २३६२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे. धरणातून वीजनिर्मितीद्वारे ८३५ क्यूसेक विसर्ग सुरु असून धरणातून एकूण ३१९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात दुपारी १२ वाजता आणखी वाढ करण्यात आली असून धरणाचा विसर्ग ४२९७  क्युसेक झाला आहे. धरणातील पाणीसाठा ८१ टक्के झाला असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास विसर्ग अजून वाढविण्याची होण्याची शक्यता देखील आहे.

मुळा धरणाच्या पाणलोटाही जोरदार पाऊस सुरु

मुळा पाणलोटात पाऊस सुरू असून शनिवारी (दि.२२) सकाळी या धरणातील पाणीसाठा १२२८३ दलघफू झाला होता. २४ तासात ४३५  दलघफू नवीन पाणी आले. पाणलोटात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सायंकाळी या धरणातील पाणीसाठा १२५१५ दलघफू (४८ टक्के) झाला होता. मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग सकाळी ४४२९ क्युसेक होता. काहीसा पाऊस कमी झाल्याने सायंकाळी तो ३४१६ क्युसेकवर आला होता. दुपारनंतर पाणलोटात पाऊस वाढल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

या शिवाय नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत दुपारी १२ वाजता नांदूर मध्यमेश्‍वर धरण विसर्ग १२५० क्युसेक तर भिमा नदी - दौंड पूल विसर्ग २२२४९ क्युसेक इतका होता.

 

Post a Comment

Previous Post Next Post