नगर - नगर
शहरातील मोहरम मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू असताना या पथकाला
मदत करायला गेलेल्या एका तरुणाला विजेचा धक्का बसला व तो जखमी झाला. मात्र महापालिकेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला
तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
शहरातील हातमपुरा चौक येथे शुक्रवारी (दि.२८) ही घटना घडली. शुक्रवारी रात्री कत्तलची रात्र मिरवणूक आणि शनिवारी मोहरम विसर्जन मिरवणूक निघणार असल्याने या मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, मेहेर लाहारे ,अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रिय अधिकारी रिजवान शेख, नितीन इंगळे, देविदास बिज्जा व पथकातील कर्मचारी राबवत होते.
हातमपुरा चौक येथे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय चौक
येथे लोखंडी टपरी हटवित असताना एक स्थानिक तरुण या पथकाला मदत करत होता. त्यावेळी टपरी शेजारच्या विजेच्या खांबाचा वीजप्रवाह टपरी मध्ये उतरून त्या
तरुणाला विजेचा जोराचा धक्का बसला. त्यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी
तत्परता दाखवत त्याला वीज प्रवाहापासून बाजूला केले आणि काही नागरिकांच्या मदतीने तात्काळ
उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने त्या
तरुणाचे प्राण वाचले आहेत.
Post a Comment