नगर - नगर तालुक्यातील शिंगवे नाईक गावातील प्रसिद्ध दत्त मंदिरात महिनाभरापूर्वी चोरी करत मूर्तीवरील सोन्याचांदीचे दागिने पळविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलीसांची पकडले आहे. सुनिल नरेंद्र यादव (रा. हारापुरा ता. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरलेले दीड लाखांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
शिंगवे नाईक (ता.नगर) येथील दत्त
मंदीरातुन अज्ञात चोरटयाने दि.२१ जून
रोजी रात्री चांदीचे सिहांसन, चांदीची छत्री, चांदीचा मुकुट, पादुका असा २ लाख २३ हजार ५०० रुपये
किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत संजय किसन खाकाळ
यांच्या फिर्यादीवरून २२ जून ला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
होता.
सदर गुन्हयाचा तपास करत असतांना
स.पो.नि. राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,
सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी सुनिल नरेंद्र यादव याने व त्याचे
साथीदारांनी मिळुन केला आहे. तो सध्या श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार स.पो.नि. सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक श्रीरामपूर येथे
पाठविले. या पथकाने आरोपीला सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपीकडुन एक
चांदीची छत्री, एक चांदीचे ताट, एक जोड
चांदीच्या पादुका, ३ चांदीचे मुकुट, सोन्याची
कर्णफुले, सोन्याचे मणी, एक जोड
चांदीचे पैजण असा सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत
करण्यात आला आहे.
सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता
न्यायालयाने त्यास दि. २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सदरचा आरोपी हा सराईत
असुन त्याचेवर ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर
ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राजेंद्र
सानप, उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ, योगेश
चाहेर, पो.ना. भागवत, पो.कॉ. किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, गजानन
गायकवाड, सुरज देशमुख यांचे पथकाने केली आहे.
Post a Comment